लिंगाणा ...स्वप्न प्रत्येक ट्रेकरचे ..
लिंगाणा ...स्वप्न प्रत्येक ट्रेकरचे ..
लिंगाणा ...हे नाव मी खूप आधी ऐकलेलं...फक्त एवढच माहित होत कि हा महाराजांचा अदभूत नजणार्या किल्ल्यांपैकी ऐक किल्ला आहे...
माझी खरतर ट्रेकिंगला सहा महिन्यापूर्वी सुरुवात झाली.. ..माझा मित्र #प्रवीण पवार ह्याचा मुळे पहिलाच ट्रेक माझा हरिहर गड झाला....त्या अविस्मरणीय ट्रेक नंतर मला हि इतरांप्रमाणेच ट्रेक ची ओढ लागली..... त्यानंतर मी असेच काही महाराष्ट्रातले काही ट्रेक चे आणि किल्ल्यांचे फोटो आणि वीडीओ मी नेट वर बघितले...तेव्हा मी सर दिलीप झुंजारराव ह्यांचा सोलो क्लायम्बिंग चा वीडीओ बघितला....आणि तेव्हा मी निशब्द झालो...त्यांनी केलेली चढाई खरोखरच अविश्वनीय आहे ....पण तेव्हा मला असा काही मला मनात आल नाही कि मी पण कधी लिंगाणा ला जाईन......
हरिहर नंतर मी २ ट्रेक केले.....कलावंतीदुर्ग आणि भैरवगड.....त्यानंतर पुढचा कुठचातरी ट्रेक करायचा तो हि हे वर्ष संपायचा आत असा ठरवलेलं ....भैरव गड मी vrangers बरोबर केला .तेव्हा त्याचं टीम वर्क आणि management बघून मस्त वाटल...तेव्हा मला कळल कि त्यांचा डिसेंबर मध्ये त्यांचा लिंगाणा इवेन्ट आहे....आणि काही दिवसांनी कळल कि प्रवीण पण चालला आहे आणि त्याने मला पण सांगितलं ....प्रवीण ट्रेक चा बाबतीत माझ्यापेशा अनुभवी आहे ..पण मी तेवढा नाही..तेव्हा अजून १ वर्ष काही ट्रेक्स करून आणी अनुभव घेऊन मग लिंगाणा ला जाऊ कि ..आता संधी मिळते आहे तेव्हा जाऊ ह्या दुस्थितीत होतो...कारण लिंगाणा ट्रेक हा ईतर ट्रेक पेक्षा कठीण ट्रेक आहे हे मी नेट वरून मिळालेल्या माहिती नुसार मला नक्कीच माहिती झाल होत....आणि माझ्या हाताशी climbing आणि rappeling चा काही अनुभव नव्हता...आणि तिकडे गेल्यावर हे करण भाग च होत... तरीसुद्धा मनाशी विचार खंबीर करून ह्या वर्षीच जायचं ठरवलं....आणि register केल......
"जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात"
vrangers चा इवेन्ट वाचल्यानंतर कळल कि त्यांचा १ आठवड्या आधी त्याचं प्रक्टिस सेशन पण आहे ....तेव्हा मी तिकडे गेलो ....तेव्हा बरच काही मला शिकण्यासारख भेटलं...रॉक क्लायम्बिंग कशी करायची...काय technique वापरायची ...तेव्हा बरीच अशी माहिती सुधीरदा नि सांगितली जी आम्हाला लिंगाणा ट्रेक ला कामी येणार होती....काही खडकावरून climbing पण केल..त्यामुळे थोडा आत्मविश्वास वाढला ...पण ते तितक पुरेश नव्हत हे माझ्या सारख्या नवख्या ट्रेकर्सला.... त्या कितपत उपयोगी येतील....हे लिंगाणा ला गेल्यावरच समजेल हे मला माहिती होत.....
मग अखेर १२ डिसेंबरला ऑफिसची दररोजची कटकटीची काम बाजूला ठेवून काही मित्रावर थोपवून कसाबसा लवकर निघून घरी आलो.....बैग आधीच भरून ठेवल्याप्रमाणे लगेच रात्रीच थोड जेवण घरी करून निघालो..आणि ठीक १०:४० ला रात्री प्रवीण बरोबर ठाण्याचा कॅडबरी पिकअप चा इथे आलो...आणि तिकडे आधीच सागर आणि अभिनय आधीच उभे होते....काही वेळाने अमित हि तिथे आला...पण तेव्हा कळल मागील ट्रेक चा अनुभवाप्रमाणे बस ला यायला उशीर होता.....मग त्या फावल्यावेळेत अभिनय कडून गरमागरम सूप आणि आम्लेट ची treat घेतली.....आणि ती वेळ सार्थकी लावली ....
नंतर काही वेळातच बस आली आमचा नि लिंगाणाकडे प्रवास चालू झाला....बस मध्ये नजर टाकली तेव्हा काही आधीच्या ट्रेक चे मित्र होते काही प्रक्टिस चा वेळी भेटलेले होते.....काही नवीन पण अनुभवी ट्रेकर्स प्रवासात मध्ये मध्ये सामील होत जात होते........मध्ये प्रवासात वरून राजा हि आमच्यावर त्यांची पुष्पवृष्टी करून गेले...पण सगळ्यांनी ऑफिसचा कामामुळे दमल्यामुळे झोपन्यातच धन्यता मानली...
सकाळी साधारण ७-८ चा दरम्यान आम्ही सगळे मोहोरी ह्या लिंगाणा च्या जवळच्या गावात पोचलो...लगेच सगळ्यांनी सकाळचा नाश्ता आणि चहा करून लगेच १ तासात ...
Introduction नंतर आनंदा दा बरोबर.सर्व सेफ्टी साहित्यानिशी आणि दुपारच्या जेवणाची sandvich आणि फळे घेऊन बोरत्याची नाळ- घळी कडे रवाना झालो..बोरत्याची नाळ चे फोटो मी कधी बघितले नव्हते...पण हे मला काहीशी संधन वैली किंवा नळीची वाट hcg ची सारखेच वाटले ..... मोठे मोठे दगड घळीत उतरलेले होते....
त्यांचावरून ऐक ऐक टप्पा पार करत आम्ही खाली आलो....एव्हाना आमची सगळ्यांची मैत्री झाली होतीच...सगळे एकमेकांना मदत करत...कठीण ठिकाणी उभे राहत मदत करत होते.....बोरत्याची नाळ पार केल्या नंतर अवघड अशा वाटेला सुरुवात झाली...सुधीर दा आणि त्यांचा बरोबरचे लीड्स आधीच गेलेले होते.... तेव्हा त्यांनी आधीच जिथे कठीण होईल जायला तिकडे आधीच दोरी लावली होती.....त्यामुळे खूप काही patches सोपे होत गेले...
त्यांचावरून ऐक ऐक टप्पा पार करत आम्ही खाली आलो....एव्हाना आमची सगळ्यांची मैत्री झाली होतीच...सगळे एकमेकांना मदत करत...कठीण ठिकाणी उभे राहत मदत करत होते.....बोरत्याची नाळ पार केल्या नंतर अवघड अशा वाटेला सुरुवात झाली...सुधीर दा आणि त्यांचा बरोबरचे लीड्स आधीच गेलेले होते.... तेव्हा त्यांनी आधीच जिथे कठीण होईल जायला तिकडे आधीच दोरी लावली होती.....त्यामुळे खूप काही patches सोपे होत गेले...
नाळ उतरल्यानंतर १ का डोंगर्याच्या कडे कडे ने गेल्यावर भव्य असा लिंगाणा चे पायथ्यापासून वर माथ्यापर्यंत दर्शन झाले....
तेव्हा समजून आले हि चढाई काही सोपी जाणार नाही आहे...ट्रेक लीड्स प्रत्येक patches वर दोर लावून पुढे पुढे जात होते....तस आम्ही सारे १ ऐक करत एकमेकांचा पाठून हळू हळू रौक क्ल्याम्बिंग करून वर जात होतो....प्रत्येक अवघड चढाई वर ट्रेक लीड असल्यामुळे आणि त्यांचा निर्देशामुळे climbing सोप होत गेल....काही ठिकाणी वरून पाय घसरला हि पण...स्वताला सावरून प्रत्येक टप्पा पार करत गेलो....
अखेर शेवटचा टप्पा पार केला नि वर शिखरावर पोचलो आणि summit केल....तो क्षण अविस्मरणीय होता माझ्यासारखाच सगळ्यांना.....समोर अस्ताला जाणार्या सूर्य नारायणाचे दर्शन आणि महाराजांचा रायगडाचे आणि तोरनाचे दर्शन विलक्षनीय होते......ते विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून पुन्हा शिखरावरून परतीचा प्रवासाला लागलो.....
शिखरावरून परतीचा प्रवास हा पूर्णपणे rappeling चा होता.....आणि त्याची सुरुवात होईपर्यंत सुर्य पूर्णतः अस्ताला गेला होता....साधारण ८०० चा वर फुटावरून अंधारात rappeling कारण प्रत्येकास अवघड जाणार होत.....पण एकाचा हि चेहऱ्यावर भीतीचा नामलेश नव्हता..उलट सगळे एन्जोय करत आरामात पुढे जात होते...उलट रात्रीचा अंधारात थरारक rappeling करायला भेटते आहे याचा आनंद होता...
मी हि कसा बसा खाली येत होतो....एका ठिकाणी मी झुडपात पाय अडकल्याने तो काढण्याचा प्रयत्नात मूळ रस्ता सोडून डावी कडे फेकला गेलो...क्षणभर तिकडे पुरा गोंधळून गेलेलो....तेव्हा आनंदा दा ने बाळा म्हणून मारलेली हाक आयुष्यभर लक्षात राहणारी आहे.....तो खाली येण्यास तयार होता....पण मी च नको बोललो...उगाच वेळ दवडण्यात अर्थ नव्हता..क्षणभर शांत डोक्याने विचार करून......कसाबसा स्वताला सावरत पुन्हा उजवी कडे आलो नि पुन्हा खाली जाण्यास सुरवात केली...Mind is never a problem mindset is .......
तरी फक्त टोर्च चा उजेडात ऐक ऐक करत ठराविक टप्पे पार करीत लिंगाणा चा पायथ्याशी सगळे जमा झाले....सर्व जणांचा बोलण्यातून लिंगाणा यशस्वी ट्रेक केल्याचा आनंद दिसत होता....
नंतर थोड्या विश्रांती नंतर पुन्हा बोरत्याची नाळ कडे प्रस्थान चालू केल.....जी नाळ सकाळी उजेडात आरामात पार केलेली ...तीच आता रात्रीचा अंधारात कठीण वाटू लागली...मी टोर्च न नेल्यामुळे मी पूर्णतः पुढील आणि मागील ट्रेकर्स वर अवलंबून होतो...पण तिथेही सोबतीला असलेले सगळे जण एकमेकांना मदत करत होते....काहींनी तर स्वतः पुढे जाऊन सर्वाना मार्ग दाखवले....अशीच दरमजल करत अंधारात चाचपडत रस्ता शोधत-चुकत गावात पोचलो.....
गावात पोचल्यानंतर लगेच फ्रेश होऊन सगळे जेवायला बसले ....starter ला दिलेले गरमागरम सूप ची चव हि दररोजच्या शहरातल्या पेक्षा हि वेगळी होती...सगळा trekking चा क्षीण लगेच निघून गेला....सगळ्यांनी आवर्जून २ दा घेतलं....त्यानंतर सगळे जण जेवणावर तुटून पडले.....जेवण आटोपून....सकाळी रायलिंग पठारावरून लिंगाणा चे दर्शन घ्यायचे असे ठरवून..सगळे इकडे तिकडे खोलीत ,बस जिथे जागा भेटेल पकडून झोपेचे निद्रीन झाले...
सकाळी जाग आली तेव्हा सुर्योदय झाला होता....तेव्हा लगेच सगळे जण तयारी करून रायलिंग कडे निघालो....रायलिंग वर जाताना....आजूबाजुला पाहिलं तर सारा परिसर ,डोंगर धुक्यात हरवून गेलेले...

काय ते अलोभनीय दृश्य होते....काही वेळातच आम्ही सगळे रायलिंग चा पठारावर पोचलो....आणि अदभूत लिंगाणा ला पाहून सगळे उल्हासीत झाले...सकाळचा धुक्यात हरवलेला माथा आणि कोवळ्या उन्हात नाह्लेला लिंगाणा पाहून पुन्हा स्तब्ध झालो....रायलिंग पठा
प्रवासात मध्येच दरी मधील नदी - कालवा जी रात्री कोणाला न दिसलेली Dr राम सरांना दिसली....आणि त्यांनी लगेच आनंदा दा ला तिकडे थांबण्याची request केली.....पण आनंदा दा चा हा आणि ना ची पर्वा न करता सगळे नदी कडे गेले....आणि पाण्यात सर्वांनी झोकून दिल....सगळा २ दिवसांचा क्षीण तिकडे निघून गेला.....दुपारच्या जेवणासाठी बस १ का हॉटेल वर थांबली ...आणि सगळे जण जेवणावर तुटून पडले....आणि तृप्त झाले...
नंतर बस मध्ये आल्यावर सगळ्यांचा ट्रेक चा feedback मस्त होता...तेव्हा आम्हा सर्वाना कळल कि....आम्हीच अशी पहिली batch आहे ज्यांनी सर्वांनी लिंगाणा summit केला....हिप हिप हुर्रेय...
आणि किल्ले लिंगाणा चे दृश्य डोळ्यात साठवून परतीचा प्रवासालो लागलो ..!!
धन्यवाद Vrangers Team ......!!
A leadership is someone who brings people together ....but if u can get ppl to follow u to the ends of the earth...u r a great leader....!!
जाता जाता काही ओळी ज्या मी १० दिवसापूर्वी लिहलेल्या पण त्या जगल्या खऱ्या या ट्रेक ला.....
जीवनाचा वाटेवरुन चालताना अनोळखी माणसे भेटतात
काही असतात मतलबी काही शिंपल्यातिल मोतिसारखी असतात...!!
स्वच्छ मनाची माणसे मिळण्यास नशीब लागत
उंच झऱ्यावरुन पडणार्ऱ्या शुभ्र पाण्याप्रमाणे मन ही निर्मळ असाव लागत...!!
कधी कधी अशीँ माणसे आयुष्यात येतात
न मिटता येणाऱ्या अशा पाउल खुणा अंत रंगात उमटवून जातात....!!
असा लोकांचा मनाची श्रीमंती कधी पैशात मोलता येत नाही...
अंतरंगात उमटलेल्या आठवणीचा त्यांचा पाउलखुणा कधी पुसता येत नाही..!!





aprtiam Varnan ......... aani haa mala tumchya aadhi panyat jaychi ghai hoti .......... pan farach majja aali
ReplyDeleteTy.. Ananda da
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteAlmost same experience kela me.... Last sat sunday with v rangers....
ReplyDeleteAlmost same experience kela me.... Last sat sunday with v rangers....
ReplyDelete