अलंग मदन - एक स्वप्नपूर्ती !!!
मध्यरात्र उलटून तिसरा प्रहर सुरु झाला असेल. आंबेवाडीतील संपूर्ण साम्राज्य चांदण्याचा कुशीत गाढ झोपी गेलं आहे. अशातच दुरुन कानावर हळदीच्या ओव्यांचे गीत कानावर साद घालत आहेत . लखनच्या अंगणात चंद्र ताऱ्यांचा चंदेरी प्रकाशाचा सडा पसरलेला आहे. आम्हा अकरा जणांची तुकडी त्यातच झोपेचे सोंग घेऊन पहुडली आहे. वर डोकावले तर नभात चांदण्याचा पकडा पकडीचा खेळ चालू आहे. वाऱ्याची थंड झुळूक चक्क मार्च महिन्यातही अंगावर काटे येण्याइतपत आपले वर्चस्व दाखवत आहे. पण कलटणारी रात्र हळूहळू चांगलेच गारठ्याचे गोडवे मुखातून गायला लागली. आता यावर तोड म्हणजे फक्त होणारी पहाटच. अलंग-मदन-कुलंग सह्याद्रीचे त्रिकुट. सह्याद्रीतील सर्वात दुर्गम आणि अवघड असलेले किल्ले. पर्यटकांपासून थोडे वंचितच ,पण तितकेच वेड्या शौर्य ट्रेकर्सना साद घालणारे शिलेदार. काहींचा असा चुकीचा समज आहे कि, जर हे तीन बेलाग किल्ले , हरिश्चंद्रगड असे काही काबीज नाही केले तर तुम्ही काय सह्याद्री बघितला. साफ चुकीचं! सह्याद्री म्हणजे फक्त ऎवढ मर्यादित नाही आहे. सह्याद्री म्हणजे!! आपला ...