लिंगाणा ...स्वप्न प्रत्येक ट्रेकरचे ..
लिंगाणा ...स्वप्न प्रत्येक ट्रेकरचे .. लिंगाणा ...हे नाव मी खूप आधी ऐकलेलं...फक्त एवढच माहित होत कि हा महाराजांचा अदभूत नजणार्या किल्ल्यांपैकी ऐक किल्ला आहे... माझी खरतर ट्रेकिंगला सहा महिन्यापूर्वी सुरुवात झाली.. ..माझा मित्र #प्रवीण पवार ह्याचा मुळे पहिलाच ट्रेक माझा हरिहर गड झाला....त्या अविस्मरणीय ट्रेक नंतर मला हि इतरांप्रमाणेच ट्रेक ची ओढ लागली..... त्यानंतर मी असेच काही महाराष्ट्रातले काही ट्रेक चे आणि किल्ल्यांचे फोटो आणि वीडीओ मी नेट वर बघितले...तेव्हा मी सर दिलीप झुंजारराव ह्यांचा सोलो क्लायम्बिंग चा वीडीओ बघितला....आणि तेव्हा मी निशब्द झालो...त्यांनी केलेली चढाई खरोखरच अविश्वनीय आहे ....पण तेव्हा मला असा काही मला मनात आल नाही कि मी पण कधी लिंगाणा ला जाईन...... हरिहर नंतर मी २ ट्रेक केले.....कलावंतीदुर्ग आणि भैरवगड.....त्यानंतर पुढचा कुठचातरी ट्रेक करायचा तो हि हे वर्ष संपायचा आत असा ठरवलेलं ....भैरव गड मी vrangers बरोबर केला .तेव्हा त्याचं टीम वर्क आणि management बघून...